Home

Home
Home 2018-12-24T14:04:52+00:00
                    

We would like to cordially invite you for the European Marathi Sammelan 2016 (EMS2016) event on 15, 16 & 17 April 2016. Dutch Marathi community is delighted to organize this event for the THIRD time in the Netherlands. The core Dutch organizers of EMS1998 and EMS2006 together with new young volunteers will strive to make the event successful for the third time by guaranteeing lots of fun, entertainment, pleasure, rich Maharashtrian food and great Dutch hospitality.

The idea of European Marathi Sammelan was nurtured by Late Dr. Anand Pandav and the first EMS event was organised in 1998 in the Netherlands. EMS is established with the sole purpose to bring together all Marathi speaking people residing in Europe and enjoy Marathi social-cultural programmes.

Please join us and be part of the EMS2016, the biggest get together of Marathi community residing all over Europe. Open your heart, challenge your hidden talents and showcase Marathi culture, traditions and heritage to the audience! Grace the event with your presence by watching European performers, invited celebrities and by enjoying the Dutch hospitality!

EMS provides you a platform to expose your hidden talents in presenting Marathi culture and tradition. This is the event that promotes Marathi culture through its rich and varied arts, literature and drama for the people residing in Europe, thereby keeping the Marathi language alive in their hearts. It provides great opportunity for three days to meet Marathi community from all over Europe and closely interact with the invited celebrities.

Date: 15, 16 & 17 April 2016
Place: Theater Hotel Almelo, The Netherlands

EMS २०१६

युरोपातल्या मराठी लोकांचा मराठमोळा सोहळा म्हणजेच युरोपीय मराठी संमेलन! मराठी कलासृष्टीतील आपल्या आवडत्या कलाकारांची साथ आणि संपूर्ण युरोप येथील इच्छुक कलाकारांच्या कलेला वाव मिळवून देणारं एक आगळ वेगळ मराठी संमेलन.

यंदा तिसऱ्यांदा हॉलंड येथे सादर होणार आहे EMS, (तत्पूर्वी १९९८ आणि २००६ साली हॉलंडने EMS चे यजमानपद भूषविले आहे) एका नव्या स्वरुपात, तरुणाईच्या जल्लोषात, विविध कार्यक्रमांसोबत, पारंपारिक डच आदरातिथ्यासोबत आणि अस्सल मराठी पदार्थांसोबत.

EMS च्या मूळ कार्यकर्त्यांसोबतच अनेक नवीन हात आणि त्यांची साथ आम्हाला लाभली. पण EMS ला जन्म देणारे डॉ. आनंद पांडव हे नेहमीच प्रेरणेच्या रुपात आमच्या सोबत आहेत. पहिलं संमेलन १९९८ साली हॉलंड येथेच पार पडल. त्यावेळी त्याची संकल्पना आणि संयोजन हे डॉ. पांडव ह्यांचं होत. ह्या संमेलनामागचा मुळ उद्देश एवढाच कि

“युरोप मधील सर्व मराठी बांधवांनी सोबत यावे,  आपल्या कलागुणांना सर्वासमोर सादर करावे,  इतरांच्या कलांविषयी जाणून घ्यावे अन असेच एकमेकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे.”

याच हेतूने पुन्हा एकदा आम्ही तयारीला लागलोय. तुम्हीही आमची साथ द्याल याची संपूर्ण खात्री आहे.

तेंव्हा सज्ज होऊयात या महोत्सवाकरिता आणि मराठी संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याकरिता. तुमच्यातील सुप्त गुणांना जागे करा आणि मनमोकळे पणाने आनंद लुटा EMS २०१६ चा.

दिनांक : १५, १६, १७ एप्रिल २०१६
स्थळ : थिएटर हॉटेल अल्मलो

error: Content is protected !!